दहावी आणि बारावी नंतर करिअरची योग्य निवड कशी करावी?

Career Planning

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीची परीक्षा. यानंतरचे करिअरचे निर्णय भविष्याची दिशा ठरवतात. पण अनेकदा चुकीच्या माहितीमुळे किंवा पालकांच्या दबावामुळे विद्यार्थी चुकीच्या क्षेत्रात प्रवेश करतात. करिअर निवडीचा निर्णय कसा असावा, हे समजून घेणे काळाची गरज आहे.

१. स्वतःची आवड ओळखा

करिअर निवडताना केवळ ‘स्कोपने’ न पाहता आपली आवड कशात आहे हे तपासा. तुम्हाला विज्ञानाची आवड आहे की कलेची? गणितात रस आहे की भाषांमध्ये? तुमची आवड ओळखणे ही पहिल्या पायरी आहे.

२. स्वतःच्या क्षमतांची चाचणी घ्या

प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत आणि क्षमता वेगळी असते. कधीकधी आपल्याला स्वतःच्या क्षमतांची पूर्ण कल्पना नसते. अशा वेळी DMIT किंवा Psychometric Test सारख्या वैज्ञानिक चाचण्या खूप फायदेशीर ठरतात. यामुळे तुम्हाला तुमच्या ‘सुप्त गुणांची’ ओळख होते.

३. बाजारातील संधींचा अभ्यास करा

फक्त पारंपारिक क्षेत्रांचा (इंजिनिअरिंग, मेडिकल) विचार न करता, आधुनिक क्षेत्रांचाही अभ्यास करा. डेटा सायन्स, डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, ॲग्रिकल्चर अशा अनेक नवीन क्षेत्रांत उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

४. तज्ज्ञांचा सल्ला घ्या

करिअर समुपदेशक (Counselor) तुम्हाला तुमच्या गुणांच्या आधारावर एक अचूक ‘रोडमॅप’ तयार करून देतात. अनुभवाच्या जोरावर ते तुम्हाला येणाऱ्या आव्हानांची कल्पना देतात.

तुमच्या करिअरचा गोंधळ दूर करायचा आहे?

आजच आमच्या तज्ज्ञांशी बोला आणि तुमच्या करिअरची योग्य दिशा निश्चित करा.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या